



बेळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२५ चा सांगता समारंभ शहरातील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.

पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड यांनी ध्वजारोहण करून समारंभाचे उद्घाटन केले, तसेच आकाशात फुगे व पांढरे कबूतर सोडून आनंद व्यक्त केला. यानंतर, पोलीस बँडच्या तालावर विविध तुकड्यांनी शिस्तबद्ध आणि आकर्षक परेडद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली.
यावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड यांनी सांगितले, “वार्षिक क्रीडा स्पर्धा जिल्हा स्तरावर अत्यंत उत्साहाने पार पडल्या आहेत. वर्षभर लोकसुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून श्रम करतात. अशा स्पर्धा त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्ती दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यात सहभाग महत्त्वाचा आहे, हार-जीत नाही,” असे त्यांनी म्हटले.
यानंतर, उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली.
यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments