
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विजापूर शहरात ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विजापूर शहराच्या शिवाजी चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार रमेश जिगजिणगी यांच्या हस्ते करण्यात आले. या दौडमध्ये शिवाजी चौकातून कंदगल हणमंतराय रंगमंदिरापर्यंत शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आनंद. के, तसेच इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी देखील या ‘एकता दौड’मध्ये सहभाग घेतला. या ‘एकता दौड’मध्ये जिल्ह्याचे माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांच्यासह अनेक युवक-युवती सहभागी झाले होते.


Recent Comments