
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दिग्विजयाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज भाजप कार्यकर्त्यांनी मोठा विजयोत्सव साजरा केला.

बिहार निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय संपादन केल्यामुळे बेळगाव दक्षिण भागातील भाजप कार्यकर्त्यांनी आज जोरदार विजयोत्सव साजरा केला. माजी आमदार संजय पाटील यांनी खासबाग येथील बसवेश्वर चौकात असलेल्या बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा आनंद व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक नितीन जाधव, गिरीश धोंगडी, सारिका पाटील, आनंद चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून भाजपच्या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांना मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला.


Recent Comments