Belagavi

फ्रॉड कॉल सेंटर चालवणाऱ्या २८ तरुणांची रवानगी कारागृहात

Share

बेळगावात बसून अमेरिकेच्या नागरिकांना फ्रॉड कॉलद्वारे पैशांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधील ३३ आरोपींपैकी २८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बेळगावात तळ ठोकून अमेरिकेच्या नागरिकांना फ्रॉड कॉलद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय फसवणूक कॉल सेंटरच्या जाळ्याचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तब्बल ३३ जणांना ताब्यात घेऊन हे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले होते. आज या ३३ आरोपींपैकी २८ तरुणांना बेळगाव येथील तृतीय जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तृतीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा आदेश दिला.

Tags: