Bailahongala

कारची विजेच्या खांबाला धडक; एक तरुण जागीच ठार

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात असलेल्या चिकबागेवाडी गावाजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

बेळगावहून बैलहोंगलकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा चिकबागेवाडी गावाजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. अपघातात कारमधील अथीक (२४) नावाचा तरुण जागीच ठार झाला. तर, दुसऱ्या प्रवाशाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तात्काळ स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार लोक प्रवास करत होते आणि ते सर्व बैलहोंगल शहरातील रहिवासी असल्याचे समजते. अपघात होताच कारमधील अन्य दोन व्यक्तींनी घटनास्थळावरून उडी मारून पळ काढल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगलचे सीपीआय प्रमोद एलिगार, एएसआय मल्लन्नवर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा अपघात बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

Tags: