विजापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुपारच्या सुमारास जोरदार आवाजासह भूमी कंप पावल्याची नोंद झाली आहे.

कंपनाच्या वेळी काही ठिकाणी घरे हादरल्याने लोक भयभीत होऊन घराबाहेर धावले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी मोठा आवाज आला आणि त्यानंतर भूमी कंप पावत असल्याचा अनुभव आला. विजापूर शहर तसेच तिकोटा तालुका, घोणसगी, कळखवटगी, मरबगी आणि दासयाळ या गावांमध्ये नागरिकांनी हे कंपन स्पष्टपणे अनुभवले. सीसी कॅमेऱ्यांमध्येही हा भयानक आवाज रेकॉर्ड झाला असून, त्यामुळे लोकांमध्ये अधिक दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अडीच महिन्यांत विजापूर जिल्ह्यात भूमी कंप पावण्याची ही १४ वी घटना आहे. सलग होणाऱ्या भूकंपांमुळे त्रस्त झालेले जिल्ह्यातील नागरिक आता सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाकडून ठोस माहिती मिळण्याची अपेक्षा करत आहेत.


Recent Comments