Belagavi

१४ नोव्हेंबर रोजी छलवादी महासभेचा चिंतन-मंथन कार्यक्रम

Share

राजकीयदृष्ट्या मागासलेल्या छलवादी समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १४ नोव्हेंबरला चिकोडी येथे छलवादी महासभेचा चिंतन-मंथन कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती छलवादी महासभेचे नेते सुरेश तळवार यांनी दिली.

बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छलवादी समाज राज्यात बहुसंख्य असूनही शैक्षणिक आणि राजकीय सोयी-सुविधांपासून वंचित आहे. इतर सर्व समाजातील लोकांनी राजकारणात आपला समाज सुरक्षित केला आहे. परंतु, छलवादी समाजाचे लोक आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने हा चिंतन-मंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले.

पुढे अरविंद गट्टी बोलताना म्हणाले की, राज्यातील छलवादी समुदायाच्या समस्यांवर आणि भविष्यातील कृतींवर चर्चा करण्यासाठी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये छलवादी समाजाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यांनी सर्व कल्याण कर्नाटक आणि कित्तूर कर्नाटकातील छलवादी समुदायाच्या लोकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Tags: