बेळगावमध्ये आमदार लक्ष्मण सवदी यांनी डिसिसी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. या निवडणुकीसंदर्भात आपला राजकीय अंदाज अचूक ठरला, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बॅंकेच्या अध्यक्षपदी अन्नासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी राजू कागे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, सवदी यांनी या दोन्ही नेत्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहकार क्षेत्रात राजकारण करणे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले असून, या निवडीमुळे लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे.
डिसिसी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रकरणात माझे कोणतेही गणित चुकले नाही. माझी राजकारणातील आकडेमोड किंवा गुणाकार-भागाकार कधीही चुकले नाहीत; मी लिहून ठेवलेल्या चोपडीत आणि गणितात मी नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतो. जिल्ह्यातील सहकारी बँक निवडणूक चांगलीच चर्चेत होती. ‘रुग्णाने मागितले आणि डॉक्टरांनी दूधच दिले’, असे म्हणत त्यांनी या निवडीवर समाधान व्यक्त केले.
बँकेला उत्कृष्ट प्रशासन देणारे अध्यक्षपदी आले याचा मला वैयक्तिक आनंद आहे. माझे आत्मीय सहकारीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. अन्नासाहेब जोल्ले आणि राजू कागे यांना मी संपूर्ण सहकार्य करेन. लोकांमध्ये असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. आम्ही सर्वजण सहकार्य देऊ. सहकार क्षेत्रात राजकारण करणे योग्य नाही. डिसिसी बँकेसाठी अन्नासाहेब जोल्ले आणि राजू कागे हे योग्य व्यक्ती आहेत. माझे मार्गदर्शन आणि सल्ला या दोघांनाही सतत मिळत राहील. आम्ही सर्वजण मिळून सहकार क्षेत्राला प्रथम क्रमांकावर घेऊन जाऊ. डिसिसी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत कोणालाही कोणताही संभ्रम नाही. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. १६ आणि अपेक्स बँक संचालकांची जबाबदारी आमच्यावर आहे. बँक जपून आणि वाढवून तिचा आदर्श निर्माण करू. डिसिसी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रकरणात मी कोणताही हस्तक्षेप केला नाही. मी काँग्रेसचा आमदार आहे; निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी जर काही अपेक्षा व्यक्त केली असती तर, मी त्यांना नक्कीच सहकार्य केले असते, असे म्हणणे त्यांनी मांडले.


Recent Comments