

बेळगाव शहरात ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य सोहळा साजरा करण्यात आला. येथील गोमटेश विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सामूहिक ‘वंदे मातरम’ गीत गाऊन हा ऐतिहासिक क्षण उत्साहात साजरा केला.

भारतीय जनता पार्टी, बेळगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वंदे मातरम गीताचे स्मरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे माजी सदस्य जगदीश हिरेमनी, माजी आमदार संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गोमटेश विद्यापीठाचे शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. सामूहिक गायनाच्या माध्यमातून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


Recent Comments