Dharwad

“जन गण मन” वरून मंत्री लाड यांचा कागेरींवर पलटवार

Share

“जन गण मन” हे गीत ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी तयार केले होते, या संदर्भात खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री संतोष लाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

धारवाडमध्ये बोलताना मंत्री संतोष लाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजप नेत्यांच्या तोंडी फक्त अशीच विधाने असतात. जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत हीच परिस्थिती आहे. भाजप नेत्यांच्या तोंडून विकासावर एक तरी शब्द येतो का? त्यांना लाज, मान, मर्यादा आहे का? पंतप्रधान बिहारमध्ये गेले तरी ते असेच बोलतात. त्यांच्या डोक्यात दुसरे काही उरले नाही का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

बिहार निवडणुकीवर बोलताना मंत्री लाड म्हणाले, “मोदींनी तिथे फसवणूक केली आहे. त्यांनी बिहारमध्ये ६५ लाख, तर हरियाणात २५ लाख मते जोडली. देशाला पक्ष नव्हे, तर ‘संविधान’ आवश्यक आहे. हे लोक सत्तेसाठी कटकारस्थाने करत आहेत. निवडणूक सुरू असतानाही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत. या आचारसंहिता भंगावर निवडणूक आयोग काय करत आहे? खोट्या मतदानाच्या बाबतीत मोदी हे विश्वगुरू आहेत. मोदी आणि निवडणूक आयुक्त हेच श्रेष्ठ गुरू आहेत. त्यांचे एकमेव यश अदानी-अंबानी हेच आहे; याव्यतिरिक्त भाजपची कामगिरी शून्य आहे. तसेच, अंदमान-निकोबारमधील ७५ टक्के जागांच्या विजयाची माहिती आयोगाने दिली नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

यावेळी ऊस उत्पादकांच्या आंदोलनाबद्दल बोलताना लाड म्हणाले, “शेतकऱ्यांचा संघर्ष चुकीचा आहे असे मी म्हणणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, काय होते ते थोडा वेळ थांबून पाहू. शेतकरी बैठकीला जात नाहीत, यावर त्यांनी ‘ते गेले नाहीत तर काय करू शकतो? याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली.”

Tags: