
कुतूहल, धैर्य आणि कौशल्यासह विद्यार्थ्यांनी धाडसाने पुढे येऊन नवीन गोष्टींचा अविष्कार करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौडा यांनी केले.

शुक्रवारी बेळगाव येथील केएलई सोसायटीच्या राजा लखमनगौडा पदवीपूर्व विज्ञान महाविद्यालयाच्या सी.व्ही. रामन सभागृहात, महाविद्यालयाच्या वतीने ‘सायंटिया व्हेनेरी-६.० टॅलेंट हंट’ आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे अध्यक्ष लिंगौडा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाचे उद्घाटन मुख्य अतिथी म्हणून राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौडा आणि अतिथी म्हणून विधान परिषदेचे माजी प्रतोद महांतेश कवठगिमठ यांच्यासह इतर मान्यवरांनी केले.
यावेळी बोलताना मुख्य अतिथी संतोष कामगौडा यांनी, “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, कुतूहल, धैर्य आणि कौशल्याच्या मदतीने नवीन अविष्कार करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी आरएलएस महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


Recent Comments