DEATH

बेळगावचे माजी क्रिकेटपटू प्रशांत निरंजन यांचे निधन

Share

बुडा स्कीम लक्ष्मी टेक येथील रहिवासी आणि बेळगावचे माजी वरिष्ठ क्रिकेटपटू प्रशांत निरंजन यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज निधन झाले

त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, वहिनी आणि मोठा परिवार आहे. तरुण उद्योजक प्रशांत केशवराव निरंजन हे उद्यमबाग येथील फ्रेश फ्युजन कंपनीचे संचालक होते. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथील रेणुका शुगर फॅक्टरी आणि ब्राझीलमधील एका कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील वरिष्ठ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी सलामी फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. आज, शुक्रवार रात्री ९ वाजता सदासिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. . क्रिकेट आणि उद्योग जगतात आपले मोठे योगदान देणाऱ्या निरंजन यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: