Belagavi

रंगकर्मी कै. येणगी बाळप्पा यांच्या नावाने नाट्यगृह निर्मितीची मागणी

Share

उत्तर कर्नाटकातील ज्येष्ठ रंगकलाकार कै. येणगी बाळप्पा यांच्या नावाने नाट्यगृह बांधण्यात यावेत, तसेच दिवंगत रंगकलाकारांच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी कन्नड भवनात नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रंग आराधना सांस्कृतिक संघटनेचे सचिव शिवानंद तारीहाळ यांनी दिली.

बुधवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कै. यशवंत सरदेशपांडे, राजू ताळिकोटी आणि अन्नपूर्णा मळगळी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी रंग आराधना सांस्कृतिक संघटनेतर्फे हा नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. साहित्यिक नीलगंगा चरंतीमठ यांच्याहस्ते नाट्य महोत्सवाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला गुरुदेवी हुलेप्पनवर मठ उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नाटककार आणि रंग दिग्दर्शक झाकीर नदाफ लिखित दोन नाट्यकृतींचे प्रकाशन देखील केले जाईल.

या पत्रकार परिषदेला झाकीर नदाफ, काशप्पा जम्बुद्वीप, सविता भैराप्पा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: