Belagavi

येळ्ळूर जवळील धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Share

बेळगाव येथील येळ्ळूर जवळील एका धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, आज त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

येळ्ळूर जवळच्या धरणात बुडून नितेश पाटील नामक १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे आज, सोमवारी सकाळी उघडकीस आले. नितेश हा धामणे एस गावाचा रहिवासी होता. तो रविवारीच पाण्यात बुडाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बसवराज हिरेमठ, पद्मप्रसाद हुली, राजू टक्‍केकर, कार्तिक पाटील या बचाव पथकातील सदस्यांनी तसेच समाजसेवक अवधूत तुडवेकर यांनी मिळून शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्याबाहेर काढला.

धामणे एस येथील रहिवासी असलेला नितेश पाटील याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, आज सकाळी ही घटना समोर आली, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.

Tags: