Vijayapura

विजापूर जिल्ह्यात पुन्हा भूंकपाचे धक्के

Share

विजापूर जिल्ह्यात काल रात्री पुन्हा भूंकपाचे धक्के जाणवले. रात्री १० वाजून ०५ मिनिटांच्या सुमारास जमीन दोनदा कंप पावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांत एकूण १२ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रात्रीच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घाबरून आपापल्या घरातून बाहेर धावले. रात्री जमीन हादरल्यामुळे नेमके काय झाले असावे, या भीतीने नागरिक घराबाहेर जमले होते.

Tags: