Belagavi

‘महाराष्ट्रातील’ नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी!

Share

उ १ नोव्हेंबर रोजी असलेल्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, बेळगाव जिल्हा प्रशासनाने ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या नेत्यांवर ही बंदी लागू केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष विजय देवणे, कोल्हापूर शिवसेनेचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेना कोल्हापूर ग्रामीण प्रमुख सुनील शिंत्रे, कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीआणि शिवसेनेच्या समर्थकांना बेळगाव शहरात प्रवेश करण्यास बेळगाव जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादले आहेत.

Tags: