Belagavi

बेळगावच्या ज्युदोपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

Share

बेळगावमधील क्रीडा वसतिगृहाच्या ज्युदोपटूंनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय विविध ज्युदो स्पर्धांमध्ये एकूण ४५ हून अधिक सुवर्णपदके जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या जबरदस्त यशामुळे या ४५ हून अधिक खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांसाठी निवड झाली आहे.

राज्य ज्युदो स्पर्धेत तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील, धनुष एल यांच्यासह अनेक खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावली आणि त्यांची निवड उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश राज्यांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी झाली.

आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत भूषण वनारसे, सौरभ पाटील, रोहण बी.एस, राधिका डुकरे, साईश्वरी कोडचवाडकर यांनी सुवर्णपदके जिंकली. या खेळाडूंची निवड मध्य प्रदेशातील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.

राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत आसिमा सन्मानी, मेघना मुळ्या, केंवरी सूर्यवंशी आरती मुरकुटे, वैभव पाटील, अंजली पाटील यांच्यासह ११ खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून राजस्थान आणि मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे.

राज्यस्तरीय पदवीपूर्व ज्युदो स्पर्धेत स्पंदना, श्वेता अलकनूर, दिव्या पाटील, सोनालिका सी.एस, संगमेश मदली, बसलींगय्या अथनिमठ, धनुष एल यांच्यासह ११ खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली आणि ते दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरले आहेत.

Tags: