Belagavi

महाराष्ट्र, गुजरात, पंजाबच्या धर्तीवर ऊसाला आधारभूत किंमत द्या

Share

महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबच्या धर्तीवर ऊसाला आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी नेगिलयोगी शेतकरी संघटनेने केली आहे.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नेगिलयोगी शेतकरी संघटनेने आंदोलन करून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले.

महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबच्या धर्तीवर ऊसाला आधारभूत किंमत देण्याची मागणी सातत्याने आंदोलनातून केली जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. याशिवाय भुईमूग आणि सोयाबीनचे पीकही खराब झाले आहे. एनडीआरएफ पथकाने पीक सर्वे करून २ महिने उलटले, तरी अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. शिल्लक राहिलेल्या ऊस पिकालाही प्रतिटन ३५०० रुपये दर देण्यात यावा. शेतकऱ्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देत नाहीत. शेतकरी वर्गाकडे पंतप्रधान मोदी देखील दुर्लक्ष करत आहेत. एफआरपी दर पूर्णपणे फसवणूक करणारा आहे. प्रतिटन ऊसाचा दर ४५०० रुपये इतका मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी नेगिलयोगी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी केली.

यावेळी मल्लिकार्जुन जुट्टन्नवर, शंकर बोळण्णवर, मनोहर सुळेभावीकर यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: