इतर राज्यांच्या धर्तीवर ऊसाचे दर निश्चित करून कारखाने सुरू करावेत. तोपर्यंत कारखान्यांना ऊस पुरवठा करू नये, यासाठी गुर्लापूर क्रॉस, मूडलगी तालुक्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून हजारो शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले.

ऊसाचे दर निश्चित करून कारखाने सुरू करावेत. तोपर्यंत कारखान्यांना ऊस पुरवठा करू नये, यासाठी गुर्लापूर क्रॉस, मूडलगी तालुक्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून हजारो शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले.
ऊस उत्पादकांनी सतत आंदोलन करूनही त्याची गांभीर्याने दखल न घेता, ऊसाचे दर घोषित न करता, साखर कारखान्यांच्या मालकांनी हंगामाला सुरुवात करून आपला हेकेखोरपणा दाखवला आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर प्रति टन ऊसाला योग्य दर देण्यात यावा. अन्यथा १ लाख शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. कारखाने केवळ ५० रुपये वाढवत आहेत, हे लज्जास्पद आहे. कारखाने केवळ ५० रुपये वाढवत आहेत, हे लज्जास्पद आहे, असा संताप चूनप्पा पुजारी यांनी व्यक्त केला.
यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments