राज्यात त्वरित दारूबंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी मद्य निषेध आंदोलन कर्नाटकच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बेळगावात आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात, हरियाणा, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये महिला ग्रामसभांच्या ठरावानुसार दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कर्नाटक राज्यातही दारू विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी महिलांनी केली.
दारूचे दुकान सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी महिला ग्रामसभेची परवानगी अनिवार्य असावी, असा कायदा मागील सरकारने लागू केला होता. मात्र, तो कायदा २०१६ मध्ये सरकारने रद्द केल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली.
दारू विक्रीचा परवाना नसतानाही अनेक गावांमध्ये घरे, पान शॉप आणि किराणा दुकानांमधून अवैधपणे दारूची विक्री केली जात आहे. या अवैध विक्रीवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी अशोक, महादेवी, वनिता, लक्ष्मी, रूपा, सुवर्णा, सागरिका यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


Recent Comments