

बेळगावच्या हिंदवाडी येथील लक्ष्मी मंदिरात क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी व उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त जवान शिवशंकर चिन्नापूर यांच्या पत्नी प्रेमा एस. चिन्नापूर उपस्थित होत्या.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती जया जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या युवा पिढीला ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शब्दांची नितांत आवश्यकता आहे. शरीर वृद्ध होते, मन नाही. आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहून, दररोज हलका व्यायाम, सोपे प्राणायाम केल्यास १०० वर्षे निरोगी आयुष्य जगू शकतो.”
यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही क्रांती महिला मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी प्रेमा चिन्नापूर, जया जोशी, पार्वती भातकांडे, प्रेमा कळीमणी, चित्रा जवळगी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षा मंगला मठद यांनी स्वागत केले. सचिव भारती रत्नपगोळ यांनी प्रास्ताविक केले. गीता एम्मी यांनी सूत्रसंचालन तर मैना कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कार्तिकोत्सवासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसह संस्थेच्या सदस्या आणि विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments