बेळगाव येथील जलाराम फाउंडेशनच्या वतीने नरगुंदकर भावे चौक परिसरातील भगवान श्री दत्तात्रय मंदिराच्या आवारात संत श्री जलाराम बापा यांची २२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात जलाराम बापांच्या धून पठणाने झाली. त्यानंतर कोकिलाबेंन ठक्कर यांच्या हस्ते मंगलारती करण्यात आली. तद्नंतर, जलाराम बापांना प्रिय असलेला भावनगरी गाठिया आणि बुंदीचा प्रसाद सुमारे ५०० ते ५५० भाविकांना वितरित करण्यात आला.
जलाराम फाउंडेशनच्या वतीने दर गुरुवारी सायंकाळी ३०० ते ३५० गरजूंना अन्नदान सेवा सातत्याने सुरू ठेवली जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी कन्नूभाई ठक्कर, बिपिनभाई सोमय्या, ललितराय शाह, अमित ठक्कर, पुष्कर कक्कर, संजय देवानी, अशोकभाई ठक्कर, प्रकाश कुलकर्णी, प्रभू यांच्यासह अनेक जलाराम भक्त उपस्थित होते.


Recent Comments