Belagavi

येळ्ळूरमध्ये स्वामी समर्थांच्या नवीन केंद्राचा प्रारंभ

Share

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्यातर्फे येळ्ळूर गावामध्ये आज श्री स्वामी समर्थांच्या नवीन केंद्राचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.

दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्राम अभियान विभाग’ अंतर्गत हे सेवा केंद्र दत्त मंदिरात सुरू झाले आहे.

या केंद्राच्या शुभारंभाच्या निमित्ताने सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री स्वामींचा भव्य पालखी सोहळा आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामुळे येळ्ळूर गावामध्ये उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या नवीन केंद्रावर आता दर सोमवारी संध्याकाळी ठीक ६:०० वाजता आरती होणार आहे. श्री दत्त मंदिर, लक्ष्मी गल्ली, येळ्ळूर येथे हे नवीन केंद्र कार्यान्वित झाले आहे.

Tags: