निवडणुकीच्या काळात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम आणि ‘स्वीप’ उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘स्वीप’ उपक्रमांद्वारे मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश राज्य ‘स्वीप’ नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (२७ ऑक्टोबर) आयोजित विशेष सर्वसमावेशक पुनरिक्षण तयारी, एसआयआर/एसएसआरची तयारी आणि ‘स्वीप’/’ईएलसी’ संबंधित कार्यक्रमांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पी. एस. वस्त्रद यांनी ‘विशेष मतदार यादी पुनरिक्षण म्हणजे काय?’ आणि ‘मतदार यादी पुनरिक्षण का आवश्यक आहे?’ याबाबत बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना माहिती दिली. विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बॅनर, पत्रके यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे ‘स्वीप’ कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील ‘स्वीप’ आणि ‘ईएलसी’ शी संबंधित शाळा व महाविद्यालयांची माहिती राज्य ‘स्वीप’ नोडल अधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा परिषदेचे नियोजन संचालक रवी एन. बंगारेप्पण्णवर, महानगरपालिकेच्या उपायुक्त रेश्मा ताळीकोटी आणि उदयकुमार बी. टी., डीडीपीयू एम. एम. कांबळे, जिल्हा पीयू नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, डी. डी. पी. आय. लीलावती हिरेमठ, डी. एच. ओ. डॉ. आय. पी. गडाद, तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments