रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनच्या वतीने पोलिओ संपविण्याच्या घोषवाक्याखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बार असोसिएशनच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

आज, २४ ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनच्या वतीने बेळगाव शहरात ‘एंड पोलिओ नाऊ’ जनजागृती रॅली काढण्यात आली. बेळगावमधील राणी चन्नम्मा सर्कल येथून सुरू झालेली ही रॅली कॉलेज रोड, त्यागवीर सिरसंगी लिंगराज अर्स सर्कल, यंदे खूट मार्गे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथे पोहोचून समारोप झाला.
या पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब जनजागृती करत आहे. यासंदर्भात रोटेरिअन अविनाश पोतदार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “जगात आतापर्यंत ९० टक्के पोलिओचे उच्चाटन झाले आहे. केवळ पाकिस्तान, नायजेरिया आणि अफगाणिस्तान यांसारख्या काही देशांमध्येच पोलिओचा धोका उरला आहे. त्या देशांमधूनही पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी रोटरी क्लब प्रयत्नशील राहील.”
रोटरी क्लब अनेक वर्षांपासून पोलिओ निर्मूलनासाठी काम करत आहे. आज, २४ ऑक्टोबर हा पोलिओ निर्मूलन दिन असून, यानिमित्ताने जनजागृती करण्यात येत आहे, असे हेमेंद्र पोरवाल यांनी स्पष्ट केले.
यावेळी रोटेरिअन्स आणि बार असोसिएशनचे सचिव दीवटे यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते.


Recent Comments