प्रार्थनेच्या नावाखाली अल्पसंख्याक समाजाकडून सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, सरकारी आवार आणि सरकारी सुविधांचा होणारा गैरवापर सरकारने तातडीने सूचना देऊन थांबवावा, अशी मागणी बेळगाव येथील श्री रामसेनेने केली आहे.

या संदर्भात आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
यानंतर ‘इन न्यूज’शी बोलताना श्री रामसेनेचे उत्तर प्रांताध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेस सरकारचे मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची वक्तव्ये करत आहेत. तसेच, हिंदूंच्या सण-उत्सवांवर सरकार निर्बंध घालत आहे. परंतु, अल्पसंख्याक समाजाचे लोक सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करत असताना त्याकडे हे सरकार केवळ ‘वोट बँक’ जपण्यासाठी दुर्लक्ष करत आहे. दिवसातून ५ वेळा लाऊडस्पीकरद्वारे होणाऱ्या प्रार्थनेसही तातडीने निर्बंध घालावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विनय अंग्रोळी, विठ्ठल गड्डी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments