‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन’च्या वतीने २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी ‘मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा-२०२५’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पैलवान अतुल शिरोळे यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या वतीने ही अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी अनगोळ, भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात होणार आहे. ही स्पर्धा १४, १७, १९ आणि ज्येष्ठ या चार वयोगटांमध्ये महिला व पुरुष अशा दोन्ही विभागांसाठी आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments