Vijayapura

विजापूरमध्ये ‘पोलीस हुतात्मा दिन’ शासकीय इतमामात साजरा

Share

राष्ट्रीय एकात्मता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात हुतात्मा पोलिसांचे कार्य चिरस्मरणीय आहे. त्यांनी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नाही, असे मत विजापूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण निंबरगी यांनी व्यक्त केले.

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त विजापूरमध्ये हुतात्मा पोलिसांना मानवंदना देण्यात आली. पोलीस परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात शासकीय इतमामात हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले. देशभरात पोलीस हुतात्मा दिन साजरा केला जात आहे. आपले अमूल्य प्राण अर्पण केलेल्या पोलिसांचे बलिदान स्मरणात ठेवण्यासोबतच, त्यांच्या कुटुंबियांसोबत पोलीस दल आणि संपूर्ण राष्ट्र ठामपणे उभे आहे, असे एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश हरीश ए, जिल्हाधिकारी डॉ. आनंद के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: