
कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात फिरणाऱ्या वीरज्योतीचे आज बेळगाव शहरात अत्यंत उत्साहाने स्वागत करण्यात आले.

खानापूर तालुक्यातील नंदगड मार्गे बेळगाव शहरात दाखल झालेल्या या ज्योतीचे महापौर मंगेश पवार यांनी कित्तूर चन्नम्मा चौकात पूजन करून स्वागत केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभा, कन्नड आणि संस्कृती विभागाचे उपसंचालक विद्यावती भजंत्री, तहसीलदार बसवराज नागराळ, मुरुगेश शिवपूजी, कस्तूरी भांवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध कलापथकांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरल्यानंतर ही ज्योत काकती गावाकडे रवाना झाली. काकती येथून ही वीरज्योत हिरे बागेवाडी, चिक बागेवाडी, तिगडी, मरीकट्टी, संपगांव या गावामार्गे बैलहोंगलला जाईल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ९ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील विधानसौधजवळ या ज्योतीयात्रेला हिरवा कंदील दाखवला होता. ही ज्योत २३ ऑक्टोबर रोजी कित्तूर येथे पोहोचणार आहे.


Recent Comments