




बेळगावमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ‘पेस ट्रॅव्हल्स’च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन रविवारी मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

बेळगावच्या कॉलेज रस्त्यावरील त्यागवीर लिंगराज महाविद्यालयासमोर, सबनीस कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस ‘पेस ट्रॅव्हल्स’च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन रविवारी मोठ्या थाटामाटात करण्यात आले.
युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या शुभहस्ते ‘पेस ट्रॅव्हल्स’चे उद्घाटन करण्यात आले. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाला सुरुवात झाली. या संस्थेचे संचालक झरीना खोजा आणि मोसिन हैदर अली खोजा यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंबालाल रायका, भूषण बांगोडी, विजय पोरवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments