Hukkeri

बेळगाव डीसीसी बँक निवडणुकीतील हुक्केरी जागेवरील स्थगिती उठली

Share

 

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील हुक्केरी मतदारसंघाच्या जागेवरील उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्यामुळे, येथील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जारकीहोळी आणि कत्ती कुटुंबांमध्ये अत्यंत चुरशीची होत असलेली ही निवडणूक आता वेळापत्रकानुसार १९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. स्थगिती उठल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली मतदानाची स्थगिती सूचना रद्द झाली असून, ७ जागांसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

जारकीहोळी आणि कत्ती कुटुंबांमध्ये अत्यंत तीव्र चुरशीची होणारी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. १९ ऑक्टोबर रोजी सात जागांसाठी मतदान होणार होते. परंतु, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हुक्केरी मतदारसंघातील ग्रामीण कृषी पतसंस्था सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात रिट याचिका दाखल झाल्यामुळे, न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते.

काही काळ हुक्केरी मतदारसंघातील डीसीसी बँकेच्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट होते. १९ ऑक्टोबर रोजी ७ जागांसाठी मतदान होणार होते आणि सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हुक्केरी मतदारसंघातील मतदान स्थगित करण्यात आल्याची अधिसूचना जारी केली होती. परंतु, आज स्थगिती उठल्यामुळे निवडणूक यथावकाश पार पडणार आहे.

Tags: