शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने, एस.एस.एस. समितीच्या महावीर मिर्जी वाणिज्य महाविद्यालयातर्फे १५ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बिल्डिंग कमिटीचे अध्यक्ष महावीर हर्दी यांनी दिली. बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात हे कार्यक्रम होणार आहे.

आज बेळगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला बळकटी देण्याच्या उद्देशाने एस.एस.एस. समितीच्या वाणिज्य महाविद्यालयाने ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेच्या उद्घाटक म्हणून आरसीयूचे कुलसचिव संतोष कामगौडा, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक कार्यालयाच्या सहसंचालक खरिमुन्निसा सय्यद आणि अध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहतील. तसेच, विनोद बरगळे अध्यक्षस्थान भूषवतील.
सत्कार समारंभासाठी विनायक बंकापूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर अशोक कुसनाळे यांची विशेष उपस्थिती असेल. विनोद पाटील अध्यक्षपद भूषवतील. डॉ. रेखा कलबुर्गी, डॉ. भारत अलसंदी आणि रवी दंडगी यांच्यासह इतरांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments