१२ ऑक्टोबर रोजी बेळगावमध्ये ‘कन्नड दीक्षा प्रतिज्ञा स्वीकार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले.

बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायणगौडा यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी उपक्रम म्हणून, राज्य आणि भाषा यांच्या संरक्षणासाठी तालुका स्तरावर ३००-४०० स्वयंसेवकांना ओळख देऊन कन्नड दीक्षा प्रतिज्ञाविधी कार्यक्रम रविवार, दि १२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

तोंटदार्य श्री सिद्धराम स्वामीजी, हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, अथणी मोटगीमठचे श्री प्रभुचन्नबसव स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडेल. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा हे अध्यक्षस्थान भूषवतील. उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, खासदार जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहतील, असे त्यांनी नमूद केले.
याव्यतिरिक्त, कर्नाटकच्या भूमी आणि भाषेवर अन्याय झाल्यास आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, “बेळगावचे विभाजन किंवा उत्तर-दक्षिण कर्नाटकचे विभाजन करणे योग्य नाही. कर्नाटक अखंड राहिले पाहिजे,” असे कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले.यावेळी राज्य संयोजक सुरेश गवन्नवर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments