Belagavi

बेळगावात ‘फ्रेया’चे दिमाखदार पदार्पण : बेळगावकरांना मिळणार इंडो-वेस्टर्न लुक!

Share

काळ बदलला आहे, युग बदलले आहे. आधुनिकतेनुसार लोकांचा ‘ड्रेसिंग सेन्स’ देखील बदलला आहे. बदललेल्या जीवनशैलीत आकर्षक इंडो-वेस्टर्न लुक आजच्या पिढीला खूप आवडत आहे. बेळगावकरांना हा इंडो-वेस्टर्न लुक देण्यासाठी दिल्ली आणि मुंबईत प्रसिद्ध असलेला ‘फ्रेया’ हा ब्रँड आता कर्नाटकात आपली पहिली शाखा घेऊन बेळगावात दाखल झाला आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे कपड्यांच्या रंगांसोबतच त्यांची शैली देखील बदलली आहे. त्यातही इंडो-वेस्टर्न लुक तर आजच्या युगात सगळ्यांनाच प्रिय आहे. दिल्ली आणि मुंबईत लोकप्रिय ठरलेला ‘फ्रेया’ हा ब्रँड आता दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात दाखल झाला आहे. आज बेळगावातील नार्वेकर गल्लीत या ब्रँडचे उद्घाटन झाले. आकाश माळी यांच्या व्यवस्थापनाखाली ‘फ्रेया’ची कर्नाटकातील ही पहिली शाखा बेळगावात सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सी. बी. कुलगोड आणि विजया कुलगोड यांच्या हस्ते फीत कापून या नवीन दालनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आदित्य डायग्नोस्टिकचे संस्थापक डॉ. संतोष कुलगोड आणि मुगळखोड येथील रेनबो सेंट्रल स्कूलचे अध्यक्ष संजय कुलगोड हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘फ्रेया’मध्ये पार्टी वेअर, हँडीक्राफ्ट, मिरर वर्क, विविध रंगांचे डेनिम, शॉर्ट टॉप, विणलेले कॉटन, स्मॉल टॉप्स, ट्युनिक्स, कॉर्डसेट, वन पीस, रेयॉन कपड्यांवरील हस्तकला, ड्रेस मटेरिअल, थ्री पीस, प्युअर कॉटन, कफ्तान कॉर्डसेट आणि इंडो-वेस्टर्न कुर्ती असे कलेक्शन या दालनात उपलब्ध आहे. हे सर्व कलेक्शन कर्नाटकात प्रथमच बेळगावमध्ये उपलब्ध झाले असून बेळगावकरांना इंडो – वेस्टर्न आऊटफिटचा आनंद घेता येणार आहे.

‘फ्रेया’च्या संस्थापिका विभाषा यांनी आपल्या या ब्रॅण्डबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, कि “फ्रेया हा इंडो-वेस्टर्न ब्रँड असून त्याने मुंबईत प्रसिद्धी मिळवली आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर आता बेळगावात आम्ही पदार्पण केले आहे. हल्ली इंडो-वेस्टर्न ट्रेंडची खूप चलती आहे आणि त्याला मागणीही वाढत आहे. दीपावलीच्या निमित्ताने सर्व कपड्यांवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. एकाच छताखाली सर्व वयोगटातील महिलांसाठी विविध प्रकारचे कपडे ‘फ्रेया’मध्ये उपलब्ध आहेत,” याचा लाभ बेळगावकरांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘फ्रेया’चे सीईओ धर्मेश शाह यांनी या ब्रॅण्डबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, कि
“कर्नाटकात बेळगावात पहिली शाखा सुरू करताना खूप आनंद होत आहे. आमचे दालन सुरू होऊन अवघ्या दोन तासांत बेळगावकरांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला समाधान वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

‘फ्रेया’चे व्यवस्थापक आकाश माळी यांनी या ब्रॅण्डबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, कि “कर्नाटकात पहिल्यांदाच बेळगावात ‘फ्रेया’ ब्रँड सुरू झाला आहे. मुंबईस्थित ही कंपनी विविध प्रकारच्या व्हरायटीचे कपडे तयार करते. त्यांचे इंडो-वेस्टर्न पॅटर्न सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. दीपावलीनिमित्त ४० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच, परफ्यूममध्येही विविध प्रकारच्या व्हरायटी असून त्यावरही ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे,” याचा लाभ बेळगावकरांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मग, आता उशीर कशाला? आपल्या दीपावलीची खरेदी ‘फ्रेया’मधून सुरू करा आणि आजच भेट द्या.

Tags: