Belagavi

बेळगाव : शहापूरमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती भक्तीभावाने साजरी

Share

रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंगळवारी बेळगाव येथील शहापूरमध्ये उत्साहात साजरी झाली.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन आपल्या साहित्यातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य महर्षी वाल्मिकी यांनी केले. त्यांचे चरित्र आजही सत्य, प्रेम आणि कर्तव्य या मूल्यांवर मार्गक्रमण करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहते, असे यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले.

शहरात एकमेव असलेल्या शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकातील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात भक्तीभावाने हा जयंती उत्सव पार पडला. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मंदिरात अभिषेक, पूजा-आरती तसेच बेटगेरी येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाचे अध्यक्षस्थानी वाय पी नाईक उपस्थित होते. वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवानंद धोंडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

वाल्मिकी समाज मंदिराचे अध्यक्ष आणि माजी आमदार एम एल मुत्तैण्णावर, सेक्रेटरी मारुती नाईक, अशोक नाईक, राजू नाईक, संजीव नाईक, बाळेश अष्टगी, हनुमंत शहापूरकर, महादेव शहापूरकर, गणपती शहापूरकर, श्याम शहापूरकर, ईराप्पा नाईक, गुंडू नाईक, शटुप्पा नाईक, गुरु शहापूरकर, हिरालाल चव्हाण, संतोष होनगल, संजय चौगुले, पुष्पा नाईक, सुधा पाटील, सुमन शिंदे, सुगंधा जाधव यांच्यासह बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्ताने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Tags: