भव्य कन्नड राज्योत्सव साजरा करण्यासाठी अधिकचे अनुदान देण्यात यावे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या कार्यालयांवर कन्नड ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचा आदेश जारी करावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी करुणाड रक्षण वेदिकेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन करुणाड रक्षण वेदिके ने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बेळगाव शहरात कर्नाटक राज्योत्सव अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. लाखो कन्नड भाषिक नागरिक या सोहळ्यात सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर, हा उत्सव अधिक दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यासाठी राज्याकडून अधिकचे अनुदान उपलब्ध करावे. याशिवाय, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये आणि राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये कन्नड ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचा आदेश लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मल्लिकार्जुन, मल्लेशी यांच्यासह करुणाड रक्षण वेदिकेचे (करवेचे) अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments