Belagavi

बेळगावात ‘स्टॅबिंग’ टोळीविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

Share

बेळगाव शहरात अलीकडे चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळे, पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या ‘घातक शस्त्र नियंत्रण पथक’ माळमारुती पोलीस स्टेशनचे पीएसआय यू. टी. पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक यशस्वी कारवाई केली आहे.

शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बेळगाव शहरात संशयित व्यक्तींची तपासणी सुरू असताना, माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वड्डरवाडी दुर्गादेवी मंदिराच्या परिसरात आरोपीला पकडण्यात आले.

पकडलेल्या आरोपीचे नाव राजू मारुती गाडीवड्डर असून, तो वड्डरवाडी, रामनगर, बेळगाव शहराचा रहिवासी आहे. पीएसआय आणि त्यांच्या पथकाने त्याला बेकायदेशीरपणे व अतिशय धोकादायक असलेले लोखंडी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करत शस्त्र जप्त करण्यात आले.

या आरोपीविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करत पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

Tags: