


गेल्या १५ वर्षांपासून बेळगावमधील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवणाऱ्या पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सने आता प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कंपनीने बेळगाव दक्षिण भागात आपली दुसरी नवीन शाखा सुरू केली आहे.

१५ वर्षांपूर्वी बेळगावच्या खडे बाजारमध्ये पहिली शाखा सुरू करून ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास जिंकलेल्या ‘पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स’ने आता आपली व्याप्ती बेळगाव दक्षिणेकडेही वाढवली आहे. शहापूरमधील शास्त्री नगर, खानापूर मेन रोड, गोवा वेसजवळ दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स’चे दुसरे भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे.
दक्षिणचे आमदार अभय पाटील, व्यवस्थापकीय संचालक एस. राजकुमार पै, वित्त संचालक मीना आर. पै आणि संचालक राहुल आर. पै यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या या प्रशस्त शोरूममध्ये पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी घरगुती वस्तू, टी.व्ही., फ्रीज यांसह आता नव्याने मोबाईल आणि फर्निचरसह विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध केल्या आहेत.
आमदार अभय पाटील यांनी सांगितले की, बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये पै इंटरनॅशनलकडून प्रथमच अभिनव स्वरूपाचा घरगुती वस्तूंचे शोरूम सुरू करण्यात आले आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांनी या शोरूमला भेट द्यावी. “एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी येथे करता येणार आहे,” असे त्यांनी म्हटले.
पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सचे सुनील यांनी माहिती देताना सांगितले की, बेळगाव दक्षिणमध्ये पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सने आपली दुसरी शाखा सुरू केली आहे. येथे विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, मोबाईल, फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध आहेत. “खरेदीवर सवलती आणि २००० रुपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन दिले जात असून, ग्राहकांना कार जिंकण्याची संधी मिळाली आहे. तसेच, कर्ज आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राहुल पै यांनी आपली दुसरी भव्य शाखा बेळगाव दक्षिणमध्ये सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एकाच छताखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू उपलब्ध आहेत. “मेगा फेस्टिव्हल सेल सुरू असून प्रत्येक खरेदीवर कुपन दिले जात आहे. कारसह इतर वस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे, याचा फायदा घ्यावा,” असे आवाहन संचालक राहुल आर. पै यांनी केले.
याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. तर मग, वाट कसली पाहत आहात? दसरा-दिवाळीच्या सणांदरम्यान तुम्हाला आवडणाऱ्या घरगुती वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजच पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या.


Recent Comments