परमपूज्य श्री केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, बेळगावातील प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून त्यांचे भावचित्र रेखाटले आहे.

ही रांगोळी तीन फूट बाय दोन फूट आकाराची असून, ती रेखाटण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. औरवाडकर यांना ही आकर्षक कलाकृती पूर्ण करण्यासाठी तब्बल अकरा तासांचा कालावधी लागला.
सदर रांगोळी वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये काढण्यात आली आहे. नागरिकांना ही रांगोळी ८ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असेल.


Recent Comments