Belagavi

हिरेबागेवाडीतील बारचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी

Share

राज्यातील बार संस्कृतीवर नियंत्रण आणण्याच्या मागणीसह राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रस्ते बांधणीला विरोध दर्शवण्यासाठी सुवर्ण कर्नाटक रक्षण वेदिकेने जोरदार निदर्शने केली.

हिरेबागेवाडीतील फार्म हाऊसेसच्या परिसरात सुरू असलेल्या एका बारचा परवाना त्वरित रद्द करावा आणि मूलभूत सुविधांची पूर्तता करूनच विद्यापीठाच्या रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीस्तव वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

हिरेबागेवाडी येथील शेतात सुरू झालेल्या बारचा परवाना रद्द करण्यात यावा आणि मूलभूत सोयीसुविधा पुरवल्यानंतरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रस्त्याचे उद्घाटन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सुवर्ण कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचून त्यांच्यामार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना सुवर्ण कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष बसवराज तुबाकी बोलताना म्हणाले, “हिरेबागेवाडीच्या सुभाष नगरमध्ये बार आणि रेस्टॉरंट सुरू झाले आहे. हे ठिकाण अनेक फार्म हाऊसच्या मध्यभागी आहे, तसेच राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शेतीत काम करणारे शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि महिलांना या बारमुळे त्रास होत आहे. जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन बारचा परवाना रद्द करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
.
पुढे बोलताना त्यांनी रस्ते निर्मितीच्या मनमानीवरही नाराजी व्यक्त केली. “येत्या शनिवारी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा रस्ता बांधताना शेतकऱ्यांची संमती घेण्यात आलेली नाही. केवळ स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली रस्ते निर्मितीचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे आधी मूलभूत सोयीसुविधा पुरवा आणि मगच रस्ता बांधा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी सुवर्ण कर्नाटक रक्षण वेदिकेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: