Belagavi

डिसिसी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांची महत्त्वपूर्ण चर्चा

Share

बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. हुक्केरी वीज सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील चुरशीनंतर आता डिसिसी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडीतही तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून, ही संपूर्ण प्रक्रिया उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी शुक्रवारी बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली.

हुक्केरी वीज सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कत्ती गटाला यश मिळाल्याचे कळताच परदेश दौऱ्यावर असलेले आमदार रमेश जारकीहोळी तातडीने सतर्क झाले. त्यांनी तात्काळ आपला परदेश दौरा अर्धवट सोडून थेट बेळगाव गाठले आणि विविध नेत्यांशी सल्लामसलत केली. डिसिसी बँकेच्या आगामी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीच्या वेळी आपल्या गटाचे बळ कायम राखण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Tags: