बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीचा पालखी उत्सव भक्तांच्या श्रद्धेची साक्ष देणारा ठरला.

देवीची मूर्ती पालखीतून प्रत्येक गल्लीत फिरवून भंडाऱ्याची उधळण करत उदो उदोच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नेते महांतेश जकाती आणि उमेश हिरेमठ यांनी सांगितले की, नवरात्रीच्या नऊ दिवसांदरम्यान तिगडी गावात सणाचे वातावरण असते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दररोज विविध आरास, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद आयोजिण्यात येत होता. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडले.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता.


Recent Comments