Belagavi

हाय टेक टीव्हीएसने ‘ऑर्बिटर’ इलेक्ट्रिक वाहन केले सादर

Share

हाय टेक टीव्हीएसतर्फे ‘ऑर्बिटर’ हे इलेक्ट्रिक वाहन सादर करण्यात आले असून दसरा आणि दिवाळीपर्यंत ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणि लकी ड्रॉची सुरुवात करण्यात आली आहे.

बेळगावकरांना टीव्हीएस कंपनीच्या नवीन आणि अत्याधुनिक बाईक्सची ओळख करून देणाऱ्या हाय टेक टीव्हीएस कंपनीने आता आपले इलेक्ट्रिक वाहन ‘ऑर्बिटर’ ग्राहकांना सादर केले आहे. बेळगावात आपली सेवा सुरू केलेल्या ऑर्बिटरचे अनावरण बेळगावच्या गोमटेश विद्यापीठात आयोजित ‘व्हायब्रंट दांडिया २०२५’ मध्ये करण्यात आले. हाय टेक टीव्हीएसचे संचालक राजेश भोसगी, विनयकुमार बाळिकाई, बसवराज तंगडी आणि राजेंद्र देसाई यांच्या उपस्थितीत जीएम विनोद आणि व्यवस्थापक रॉय, रोटेरियन रवी, रोटेरियन राजपुरोहित, रोटेरियन शशिकांत नाईक, मानवेन्द्रसिंग जे आणि शरद हेडा यांनी या वाहनाचे औपचारिक अनावरण केले.

यावेळी हाय टेक टीव्हीएसचे संचालक राजेश भोसगी आणि विनयकुमार बाळिकाई यांनी हाय टेक टीव्हीएसमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीएसच्या ‘ऑर्बिटर’ ईव्हीबद्दल अधिक माहिती दिली. उत्तर कर्नाटकात पहिल्या तिमाहीत नंबर १ चा बाजार हिस्सा प्राप्त केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हाय टेक टीव्हीएसची वाढ आणि ईव्ही ची कार्यक्षमता याबद्दलही त्यांनी मत मांडले.

हाय टेक टीव्हीएसमध्ये दसरा आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विशेष ऑफर सुरू आहेत. कमी डाउन पेमेंट, जुनी बाईक देऊन नवीन बाईक खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफर, जीएसटी कपात, स्क्रॅच कार्डमधून सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे, हेल्मेट, कव्हर आणि तसेच लकी ड्रॉमध्ये कार, फ्रीज यांसारख्या विविध ऑफर्स सुरू आहेत. दसरा आणि दिवाळीच्या सणापर्यंत ही ऑफर लागू राहील, असे योगेश यांनी सांगितले.

टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये अत्याधुनिक डिझाईन आणि तंत्रज्ञान समाविष्ट आहे. यात १४ इंच टायर्स, डीआरएल, एलईडी हेड लॅम्प्स, अत्याधुनिक डिस्प्ले, ४३ लीटर डिक्की स्पेस आणि लांबच्या प्रवासासाठी क्रूझ कंट्रोलची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच नेव्हिगेशन, रिव्हर्स, मेसेज अलर्टसारख्या इतर सुविधाही उपलब्ध आहेत.

तर मग वाट कशाची पाहत आहात? बेळगावातील जुना पुणे बंगळूर रस्ता आणि खानापूर रस्ता, डी मार्ट जवळ, थर्ड गेट जवळ असलेल्या हाय टेक टीव्हीएस शोरूमला भेट द्या आणि आजच ईव्ही ऑर्बिटरची खरेदी करून तुमचा दसरा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करा.

Tags: