कर्नाटक योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या आश्रयाखाली बेळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मुणवळी येथे आयोजित ‘कर्नाटक पॅरा स्टेट डिसएबल्ड योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप-२०२५’ मध्ये युवा खेळाडू वेदांत शिरगुप्पे याने प्रथम स्थान पटकावून लक्ष वेधून घेतले आहे.

जनता शिक्षण प्रसारक संघाच्या सभागृहात १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या चॅम्पियनशिपमध्ये, ट्रेडिशनल योगासन सिंगल डेफ (१७ वर्षांखालील मुलांची स्पर्धा) या प्रकारात वेदांतने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले. याच गटात इरफान शेख आणि राजीव शंकरगौडा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.
कर्नाटक योगासन स्पोर्ट्स असोसिएशन संस्था ही योगासन भारत आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेली संस्था आहे. ही संस्था विशेष क्षमता असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.


Recent Comments