Belagavi

सुरेश यादव फाउंडेशनच्या वतीने दसऱ्याच्यानिमित्त दांडिया उत्सव

Share

बेळगाव मधील रामतीर्थ येथील श्री विरभद्रेश्वर मंदिरात सुरेश यादव फाउंडेशन व रामतीर्थ रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने दसऱ्याच्या सणानिमित्त दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, “आपली संस्कृती जपून वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात. दांडिया नृत्य जीवन आणि ब्रह्मांडाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते आणि हे सामाजिक एकता व प्रेमाचा संदेश देते.” त्यांनी सुरेश यादव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला शुभारंभ करताना शिबा श्रीनिवास नागल म्हणाले की, “दांडिया नृत्य शारदीय नवरात्र उत्सवाचा अविभाज्य भाग असून यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ होतो. हे नृत्य देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी, सामाजिक संबंध बळकट करण्यासाठी तसेच शरीराच्या तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे.” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश यादव म्हणाले की, “धार्मिक आणि आध्यात्मिक दांडिया रास हा गुजरातमधील पारंपरिक लोकनृत्य असून, कृष्ण-राधेच्या लीलेचे प्रतीक आहे. हे देवी दुर्गेची पूजा करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असून भक्ती आणि समर्पण दर्शविण्याचा प्रकार आहे.”

कार्यक्रमात मुरुगेंद्र पाटील, मुक्तार पठाण, सी. पी. आय., कालीमिर्ची, पूर्णिमा यादव, अन्वरभानू, वीरनगौड पाटील, बाळप्पा हांजी, शंकर जीनराळे, संतोष मेरेकर, स्नेहल बेल्ली, पवन गुणकी, एम. एस. नायक आणि रामतीर्थ नगर येथील गणेश मंडळाचे सदस्य तसेच सर्व रहिवासी उपस्थित होते.

Tags: