
बेळगावची नारायणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या कांगली गल्ली येथील श्री दुर्गामातेच्या दरबारात नवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावची नारायणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या कांगली गल्ली येथील श्री दुर्गामातेच्या दरबारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी नवरात्रीत महाराष्ट्रातील वनीच्या सप्तशृंगीच्या आणि महाकालीच्या रूपात दुर्गेची आराधना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह विविध ठिकाणांहून हजारो लोक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
रविवारी रात्री कांगली गल्ली येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २५ हजारांहून अधिक लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.


Recent Comments