
नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच स्कंदमातेच्या पूजनाच्या शुभमुहूर्तावर, बेळगावमधील वडगाव भागात ‘श्री दुर्गामाता दौड’ अत्यंत उत्साहात संपन्न झाली.

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा संदेश घेऊन आयोजित केलेल्या या दौडमध्ये हजारो धारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वडगाव परिसरातील प्रत्येक गल्लीत नागरिकांनी आरती करून दौडचे स्वागत केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले होते.
देव, देश आणि धर्म रक्षणार्थ संदेश देत आज बेळगावच्या वडगाव भागात श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची आराधना करत, देव, देश आणि धर्म रक्षणार्थ संदेश देत आज बेळगावच्या वडगाव भागात श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. खवासबागमधील दुर्गामाता मंदिरात प्रेरणामंत्रासह ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दौडने भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर, भारतनगर ४ वी, ५ वी आणि ६ वी क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सप्पार गल्ली, रथ गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मुख्य रस्ता, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेगगीन गल्ली, जुना बेळगाव रस्ता, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नुकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, क्रॉस नं. ३, हरिजन वाडा, हरमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रस्ता, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली मार्गे प्रवास केला. शेवटी वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई मंदिरात पोहोचून प्रेरणामंत्रासह ध्वजावरोहण करून आजच्या दौडची सांगता झाली. हजारो धारकऱ्यांनी दौडमध्ये भाग घेतला होता. प्रत्येक गल्लीत आरती करून दौडचे स्वागत करण्यात आले.
शनिवार, २७ सप्टेंबर रोजी बेळगावातील सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिरापासून दौडला सुरुवात होईल आणि विविध मार्गांवरून प्रवास करत शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात पोहोचून सांगता होईल.


Recent Comments