जाती सर्वेक्षणात आम्हालाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करत हक्कीपिक्की समाजाने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. ते म्हणाले, ‘हक्कीपिक्की समाज जंगलात राहतो. आम्ही भारतात राहत असूनही सरकारकडून आम्हाला कोणत्याही सरकारी सुविधा मिळत नाहीत. आमच्याकडे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड देखील नाही. आता सरकारने जाती सर्वेक्षणातही आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. आम्हालाही मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी.’ अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात हक्कीपिक्की समाजाचे अनेक लोक सहभागी झाले होते.


Recent Comments