Hukkeri

हुक्केरी हिरेमठात दसरा महोत्सवाला थाटात सुरुवात

Share

हुक्केरी येथील हिरेमठात नऊ दिवसांच्या दसरा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तहसीलदार बळराम कट्टीमणी यांनी धर्मध्वज फडकवून या उत्सवाचे उद्घाटन केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात चंदगडी येथील वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर नगराध्यक्ष इम्रान मोमिन, महावीर निळजगी, परगौडा पाटील, सुभाष नाईक, चन्नप्पा गजबर, ए.के. पाटील, सुरेश जिनराळे आणि ए.एस. पद्मण्णवर उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी बोलताना तहसीलदार म्हणाले, ‘आज हुक्केरी शहराच्या हिरेमठात दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.’

यावेळी बेळगाव शहरी विकास विभागाचे उपसंचालक बसवराज हिरेमठ यांनी सांगितले की, ‘दरवर्षीप्रमाणे हुक्केरीच्या हिरेमठात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. राज्यात मैसूर दसरा आणि उत्तर कर्नाटकातील हुक्केरी हिरेमठातील दसरा हे उत्सव खूप भव्य असतात. जात-पात, धर्म-पंथ यांचा भेदभाव न करता साजरे होणारे हे उत्सव असून या उत्सवात राज्यात उत्तम पीक पाण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

यावेळी चंद्रशेखर महास्वामीजी म्हणाले, ‘या वर्षीच्या दसरा उत्सवादरम्यान, नऊ दिवस सकाळी आणि सायंकाळी विविध पूजा-अर्चा, पालखी उत्सव, रथोत्सव, आणि गुड्डापूर दानम्मा देवीचे प्रवचन आयोजित केले आहे. तसेच नऊ दिवस भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला जाणार असून यासाठी येथील महिलावर्ग परिश्रम गहेत आहे. यावेळी मठाचे पदाधिकारी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: