१९ वर्षांखालील पीयूसी लेव्हल १ आणि २ रोलर स्केटिंग जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी २०२५, बेळगावातील शिवागंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे पार पडली.

सार्वजनिक शिक्षण विभाग, पीयू बोर्ड बेळगाव, गोपाळजी इंटिग्रेटेड पीयू कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४० हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला. गोपाळजी पीयू कॉलेजच्या प्राचार्या भारती रांगणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात श्री रोकडेने २ सुवर्णपदके, शौर्य भोसलेने १ सुवर्ण आणि १ रौप्य, प्रसन्न वाणीने १ रौप्य आणि १ कांस्य, साई समर्थ अजानाने १ रौप्य, तेजस साळुंकेने १ कांस्य आणि समर्थ पाटीलने १ कांस्यपदक जिंकले. तर, १९ वर्षांखालील मुलींच्या गटात करुणा वाघेलाने ३ सुवर्णपदके पटकावली.
यावेळी कॉलेजचे क्रीडा प्रभारी महेंद्र पाटील, बाहुबली बाबण्णावर, अश्विनी कलमणी, सुनील सुणगार, संतोष कागिनवर, महेश भजंत्री, वीणा नायक, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडालगेकर, हृषिकेश पसाारे, सोहम हिंडालगेकर यांच्यासह पालक आणि स्पर्धक उपस्थित होते.


Recent Comments